शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेही सांगली महापालिकेच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:12 IST

सांगली : महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. मनसे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असली तरी, प्रसंगी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची तयारी आहे. पण त्याचा निर्णय अध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी ...

सांगली : महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. मनसे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असली तरी, प्रसंगी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची तयारी आहे. पण त्याचा निर्णय अध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.मनसेने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, भ्रष्ट नगरसेवकांनी महापालिकेत लुटीचा धंदा केला आहे. आता तर नगरसेवकच ठेकेदार बनले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी-भाजपची महाआघाडीच्या सत्ता काळातही भ्रष्ट नगरसेवकांच्या हाती कारभार होता. आताही तेच नगरसेवक पक्ष बदलून पुन्हा महापालिकेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांना रोखण्यासाठी मनसे मैदानात उतरणार आहे. आम्ही २५ ते ३० जागा लढण्याची तयारी केली आहे. मनसेची ताकद लक्षात घेता, आघाडीसाठी इच्छुक आहोत. पण त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.शहराध्यक्ष अमर पडळकर म्हणाले, नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढणार आहोत. दुसरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह आम्ही सर्वजण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सरचिटणीस नितीन सोनावणे म्हणाले, मिरजेत तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव भाजपमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृत तसे काही कळविले नाही. ते पक्षासोबतच राहतील. शिवाय त्यांच्यासमवेत चारजणांचे पॅनेल मनसे उभे करणार आहे. ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात चारजणांचे पॅनेल उभे राहील.यावेळी आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, लीना सावर्डेकर, रोहित घुबडे आदी उपस्थित होते.भ्रष्ट कारभाराचे चित्र बदलणार : स्वाती शिंदेप्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून, त्यांना न्याय मिळत नाही. दिग्गज नगरसेवक पत्नी, मुलगी, भावजयींना मैदानात उतरवून जागा अडवतात. त्यांच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कारभारी होतात. महिला भ्रष्ट कारभाराला कुठेच विरोध करीत नाहीत. यांचा लुटीचा अखंड कारभार सुरू आहे. हे चित्र मनसे बदलेल.